Tue, Nov 13, 2018 05:57



होमपेज › Ahamadnagar › नगर जिल्हा विभाजनासाठी सकारात्मक : चंद्रकांत पाटील

नगर जिल्हा विभाजनासाठी सकारात्मक : चंद्रकांत पाटील

Published On: Feb 03 2018 9:51AM | Last Updated: Feb 03 2018 9:51AM



नगर : प्रतिनिधी

राज्यातील जिल्हा व तालुका विभाजनाबाबत कमिट्यांचे अहवाल आले आहेत. नगर जिल्हा विभाजनाचा अहवालही मिळाला आहे. सर्व नागरीकांची भावना लोकप्रतिनिधी म्हणून पालकमंत्री राम शिंदे यांनीही  मांडली आहे. त्यामुळे जिल्हा  विभाजनाबाबत सरकार  सकारात्मक असून, अहवाल तपासून निर्णय होइल, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

नगर जिल्हा विभाजनाचा रेंगाळलेला प्रश्न अलिकडच्या काही दिवसांत पुन्हा चर्चेत आला आहे. पालकमंत्री शिंदे यांनी निवडणुकीपूर्वी जिल्हा विभाजन करणारच असल्याचे कोपरगावमध्ये सांगितले होते. त्यानंतर महसूल मंत्री पाटील यांनीही जिल्हा विभाजनाबाबत सकारात्मक असल्याचे व पालकमंत्र्यांनी जनतेचीच भावना मांडल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सरकारच्या स्तरावरही विभाजनाच्या हालचाली सुरू झाल्याचे स्पष्ट आहे.

दरम्यान, नगर शहरातील उड्डाणपूल नकी होणार आहे. डीपीआर अंतिम टप्प्यात आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच नगर महापालिकेतील प्रकरणे माझ्यापर्यंत आली आहेत, माहिती घेऊन पुढील कारवाई होईल, असेही ना. पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी पालकमंत्री शिंदे, खा. दिलीप गांधी, उपमहापौर श्रीपाद छिंदम, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड उपस्थित होते.