Wed, Apr 24, 2019 20:19होमपेज › Ahamadnagar › गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारा

गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारा

Published On: Jun 03 2018 1:11AM | Last Updated: Jun 02 2018 11:45PMकचेरीसमोर उपोषण
नगर : प्रतिनिधी

स्व. गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारण्याबाबत सरकारने दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता झालेली नाही. त्याच्या निषेधार्थ जय भगवान महासंघाच्या वतीने काल (दि.2) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. यावेळी राज्य सरकारच्या उदासीन व नाकर्तेपणाचा निषेध नोंदविण्यात आला. 

भाजप सरकार सत्तेवर असताना गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक होणे अपेक्षित होते. शासकीय कार्यालयात मुंडे यांचा फोटो लावला जात नाही. राज्य सरकारने स्मारकासंदर्भात दिलेले आश्‍वासन पाळले नसल्याने समाजामध्ये मोठी नाराजी आहे. मुंडे यांच्या औरंगाबाद येथील स्मारकासाठी निधी उपलब्ध करुन तात्काळ काम सुरु करावे. मराठवाडा विद्यापीठातील संशोधन केंद्रास निधी द्यावा. मुंडे ऊस तोडणी कामगार कल्याणकारी महामंडळास कार्यालय, कर्मचारी,  निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली. सदर मागण्या मान्य न झाल्यास राज्यात चक्काजाम आंदोलन करून, लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकार्‍यांना घेराव घालण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

या उपोषणात जिल्हाध्यक्ष संजय फंड, प्रदेशाध्यक्ष सुभाष जावळे, शिवाजी पालवे, अंबादास सरपंच, शिवाजी बोदरे, अमोल घुगे, शुभम सांगळे, बबलू सांगळे, उमेश कांगणे, शंकर झिने, गोरख पवार, ज्ञानेश्‍वर गायकवाड, सचिन अकोलकर, मुन्ना सौदागर, यमनाजी आघाव, सुधाकार आव्हाड आदी सहभागी झाले होते.