Tue, Sep 25, 2018 10:37



होमपेज › Ahamadnagar › दिल्लीगेटला शिवाजी महाराजांचे नाव द्यावे!

दिल्लीगेटला शिवाजी महाराजांचे नाव द्यावे!

Published On: Sep 08 2018 1:31AM | Last Updated: Sep 07 2018 11:00PM



नगर : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची बीजे नगरच्या ‘निजामशाही’त आढळून येतात. शिवाजी महाराजांनी त्यांच्या हयातीत दोन वेळा नगर शहरास आपल्या अंमलाखाली घेण्याचे प्रयत्न केले होते. महाराजांच्या या स्मृती निरंतर जपल्या जाव्यात यासाठी दिल्लीगेट येथील वेशीचे ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ असे नामकरण करावे, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने महापौर सुरेखा कदम यांच्याकडे केली आहे.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत याबाबत ठराव करण्यात यावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले की, शहाजी राजांची ही स्मृती जपण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेने शहाजी मोहल्ला परिसराला शहाजी रोड असे नामकरण केले. छत्रपती शिवरायांनीही त्यांच्या हयातीत दोन वेळा नगर शहर आंमलाखाली आणण्याचा प्रयत्न केला होता. या स्मृती निरंतर रहाव्यात. भविष्यातील नगरच्या नव्या पिढीला शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाची माहिती व्हावी, यासाठी दिल्लीगेट वेशीला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ असे नाव देण्यात यावे. तसा ठराव महासभेत करावा, अशी मागणी भैरवनाथ वाकळे, विकास गेरंगे, रामदास वागस्कर, दिपक शिरसाठ, तुषार सोनवणे, रवींद्र वाघमारे, अमोल चेमटे यांनी केली आहे.