Sun, Nov 18, 2018 01:45होमपेज › Ahamadnagar › आवर्तनाचा लाभ शेवटपर्यंत द्या

आवर्तनाचा लाभ शेवटपर्यंत द्या

Published On: Apr 17 2018 1:54AM | Last Updated: Apr 16 2018 11:52PMराहाता : प्रतिनिधी

गोदावरीतून सुरू असलेल्या आवर्तनाचा लाभ शेवटच्या शेतकर्‍याला मिळेल, यासाठी जलसंपदा विभागाने सतर्क राहून कार्यवाही करावी, अशी सूचना विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
ना. विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक येथे जलसंपदा विभागाच्या कार्यालयात गोदावरी धरण समूहातून सुरू असलेल्या आवर्तनाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. गणेश सहकारी साखर कारखान्याचे

अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ, उपाध्यक्ष विष्णूपंत जगताप, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, अ‍ॅड. रघुनाथ बोठे यांच्यासह जलसंपदा महावितरणचे  अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. शेतकर्‍यांच्या दृष्टिने हे आवर्तन खूप महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून विखे  म्हणाले की, या आवर्तनाचा लाभ सर्व शेतकर्‍यांना होण्यासाठी विभागाने समन्वय साधून व सतर्कतेने जबाबदारी पार पाडण्याची सूचना केली. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान, आवर्तन सुटणार असल्याने लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. या आवर्तनामुळे उन्हाळी पिकांना लाभ होणार आहे.

Tags : Ahmadnagar, Give, benefit, return, end