Mon, Apr 22, 2019 11:44होमपेज › Ahamadnagar › शहीद युवकांच्या कुटुंबाला  50 लाखांची आर्थिक मदत द्या

शहीद युवकांच्या कुटुंबाला  50 लाखांची आर्थिक मदत द्या

Published On: Aug 10 2018 12:56AM | Last Updated: Aug 09 2018 11:44PMनगर : प्रतिनिधी

मराठा क्रांती आंदोलनात शहीद  झालेल्या युवकांच्या प्रत्येक कुटुंबाला 50 लाख रुपयांची आर्थिक मदत व कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी देण्यात यावी, शहीद काकासाहेब शिंदे व रोहन तोडकर यांच्या मृत्यूप्रकरणी व आंदोलकांवर करण्यात आलेल्या गोळीबाराच्या घटनांची एसआयटी नियुक्‍त करुन, चौकशी करण्यात यावी, विविध आंदोलनांतील मराठा बांधवांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत,अशा एकूण 21 मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. 

सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने काल (दि.9) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला  इतर समाज बांधवांनी देखील पाठींबा दिला होता.  या आंदोलनानंतर सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यासाठी निवेदन तयार केले. सदर 21 मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना देण्यात आले.कोपर्डीतील आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी, कायदेशीर पर्यायांचा  अवलंब करीत मराठा आरक्षणाचा निर्णय तात्काळ घेतला जावा, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर रोखण्यात यावा, मराठा विद्यार्थ्यासाठी उच्च शिक्षण व परदेशी शिक्षणासाठी भरीव अनुदान तसेच बिनव्याजी, विनातारण कर्जाची सुविधा उपलब्ध करावी, आरक्षणाशी संबंधित सर्व विषयांना सरकारने तात्काळ न्याय द्यावा, 1 जानेवारी 2018 रोजी सणसवाडी दंगलीत हत्या झालेल्या राहुल फटांगडेच्या सर्व मारेकर्‍यांना अटक करुन, फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशा विविध 21 मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे.