Wed, Nov 21, 2018 23:33



होमपेज › Ahamadnagar › नीरव मोदीच्या जमिनी मूळ मालकांना द्या

नीरव मोदीच्या जमिनी मूळ मालकांना द्या

Published On: Mar 01 2018 1:46AM | Last Updated: Mar 01 2018 12:12AM



नगर : प्रतिनिधी

हिरे व्यापारी नीरव मोदी यांच्यासह फायर स्टोन कंपनी व देविदास चव्हाण याने कर्जत तालुक्यातील खंडाळा या गावात तर होलेवाडी येथे लॅण्ड माफिया, सावकार, राजकीय पुढारी व धनदांडग्यांनी शेतकर्‍यांच्या जमिनी अल्पदरात लाटल्या. या लाटलेल्या हजारो एकर जमिनी मूळ शेतकर्‍यांना परत मिळण्यासाठी पिपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने काळी आई मुक्ती संग्रामची घोषणा करण्यात आल्याची माहिती अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी दिली.

कर्जत तालुक्यातील खंडाळा या गावात नीरव मोदी याने 110 हेक्टर जमीन खरेदी केली आहे. त्याचप्रमाणे फायर स्टोन या कंपनीने 110 हेक्टर जमीन तर देविदास चव्हाण याने 218 हेक्टर जमीन शेतकर्‍यांकडून खरेदी केली आहे. तिघांची मिळून 438 हेक्टर जमीन आहे. ही जमीन शेतकर्‍यांकडून अल्पदरात खरेदी करण्यात आलेली आहे.