Wed, Jun 26, 2019 11:56होमपेज › Ahamadnagar › नगरमध्ये मुलीच अव्वल

नगरमध्ये मुलीच अव्वल

Published On: May 31 2018 1:33AM | Last Updated: May 30 2018 11:56PMनगर : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानेे घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यामध्ये यावेळीही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचे उत्तीर्णांचे प्रमाण तब्बल 94.25 टक्के इतके आहे. जिल्ह्याचा निकाल 89.25 टक्के लागला असून, राहुरी तालुक्यांची टक्केवारी सर्वाधिक 92.19 इतकी आहे.

राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून काल (दि.30) सकाळी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर दुपारी 1 वाजता ऑनलाईन हा निकाल उपलब्ध करण्यात आला. निकाल पाहण्यासाठी शहरातील विविध नेट कॅफेवर विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. मंडळाने उपलब्ध करून दिलेल्या विविध वेबसाईटवरही विद्यार्थ्यांनी मोबाईलवर निकाल पाहिला.

जिल्ह्यात यंदा बारावीच्या परीक्षेला 62 हजार 141 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 55 हजार 461 (89.25 टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा निकाल 97.29 टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल 92.75 तर कला शाखेचा निकाल 75.46 टक्के लागला आहे. तिन्ही शाखांचे मिळून 4 हजार 501 विद्यार्थी विशेष गुणवत्तेसह (75 टक्क्यांपेक्षा जास्त), 25 हजार 289 विद्यार्थी प्रथम श्रेणीत (60 टक्क्यांपेक्षा जास्त), 24 हजार 274 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत (50 टक्क्यांपेक्षा जास्त), तर 1 हजार 477 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आहेत. नगर शहरात 10 हजार 196 विद्यार्थी या परीक्षेस बसले होते. त्यापैकी 8 हजार 42 विद्यार्थी (88.68 टक्के) विद्यार्थी उभीर्ण झाले आहेत. शहरातही मुलीच अव्वल ठरल्या असून, त्यांचे उत्तीर्णांचे प्रमाण 94.17, तर मुलांचे उत्तीर्णांचे प्रमाण 84.56 टक्के आहे. 

तालुकानिहाय निकालाची टक्केवारी 

नगर- 88.68, अकोले- 89.86, जामखेड- 89.89, कर्जत-91.56, कोपरगाव- 88.83, नेवासा- 85.57, पारनेर- 91.85, पाथर्डी- 86.92, राहाता- 90.03, राहुरी- 92.19, संगमनेर- 91.71, शेवगाव- 90.07, श्रीगोंदा- 86.83, श्रीरामपूर- 86.62.