Wed, Nov 21, 2018 03:17



होमपेज › Ahamadnagar › मुलीस छेडणार्‍यास  ७५ हजारांचा दंड

मुलीस छेडणार्‍यास  ७५ हजारांचा दंड

Published On: Dec 04 2017 1:39AM | Last Updated: Dec 03 2017 11:09PM

बुकमार्क करा





नगर : प्रतिनिधी

महाविद्यालयीन मुलीचा पाठलाग करून तिला छेडल्याबद्दल आरोपी किरण सुरेश शिंदे व विनोद उर्फ बाळा रघू कांबळे या दोघांना 75 हजार रुपयांचा दंड जिल्हा सत्र न्यायाधीश पी. आर. भावके यांनी ठोठावला. 

शहरातील चितळे रस्त्यावरील एका वसतिगृहात राहणार्‍या विद्यार्थीनीचा आरोपी किरण शिंदे व विनोद कांबळे सतत पाठलाग करत होते. तिच्याकडे मोबाईल नंबरची मागणी करत होते. तिने मोबाईल नंबर देण्यास नकार दिला. तरीही दोघांनी पाठलाग करणे सुरूच ठेवले. किरण हा दि.18 डिसेंबर 2015 रोजी सकाळी साडे सात वाजता या विद्यार्थीनीच्या वर्गात घुसून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे गैरवर्तन केले होते. तिने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.