Sat, Jul 20, 2019 15:02होमपेज › Ahamadnagar › पोलिसांमार्फत गिरवलेंची हत्या; धनंजय मुंडेंचा शिवसेनेवर आरोप

पोलिसांमार्फत गिरवलेंची हत्या; धनंजय मुंडेंचा शिवसेनेवर आरोप

Published On: Apr 19 2018 7:18AM | Last Updated: Apr 19 2018 7:18AMनगर : प्रतिनिधी

केडगाव येथील हत्याकांड दुर्दैवी आहे. मात्र, शिवसेनेने स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी आ. संग्राम जगताप यांना या गुन्ह्यात गोवले. त्यानंतर पोलिस अधीक्षक कार्यालयात तोडफोडीचा प्रकार घडला. यातील दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. मात्र, निर्दोषांवर कारवाई नको. कैलास गिरवले यांनाही या गुन्ह्यात अडकविण्यात आले. पोलिसांच्या मारहाणीमुळे त्यांची प्रकृती बिघडली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. एकूणच या सर्व प्रकरणात शिवसेनेने सत्तेचा, पोलिसांचा वापर केला. शिवसेनेने पोलिसांमार्फत कैलास मामांची हत्या केली, असा गंभीर आरोप करत या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

शिवसैनिकांची हत्या, पोलिस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड, कोठडीत असलेल्या गिरवले यांचा झालेला मृत्यू या सर्व पार्श्‍वभूमीवर विरोधी पक्षनेते मुंडे बुधवारी (दि. 18) नगर दौर्‍यावर आले होते. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस भवनात पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यानंतर त्यांनी गिरवले यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याशी चर्चा करून पत्रकारांशी संवाद साधला.  

Tags : Kedgaon, Shivsena, Murder, Giravale, MLA, Jagtap, Kardile, NCP, Dhananjay Munde,