Thu, Apr 25, 2019 07:45होमपेज › Ahamadnagar › ग्रा.पं. कर्मचार्‍यांचे ‘बोंबाबोंब’!

ग्रा.पं. कर्मचार्‍यांचे ‘बोंबाबोंब’!

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 15 2018 11:55PMनगर : प्रतिनिधी

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे पगार ऑनलाईन होण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या बोंबा व घोषणांनी जिल्हा परिषदेचा परिसर दणानून निघाला.या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष कॉ.सुभाष लांडे, जनरल सेक्रेटरी अ‍ॅड.कॉ.सुधीर टोकेकर, एकनाथ वखरे, संदिप आल्हाट, कॉ.संजय डमाळ, संतोष लहासे, धनराज गजरमल, सुनिल शिंदे, सुरेश कोकाटे, राजेंद्र कोरडे, कॉ.संजय शेलार, अस्लम सय्यद, इंद्रभान दगडू, उत्तम कटारे, सचिन कांबळे, चंद्रकांत उघडे, अंजना आढाव आदी सहभागी झाले होते.

गेल्या सहा ते आठ महिन्यापासून ग्रामविकास मंत्रालयाने आकृतीबंधातील कर्मचार्‍यांचे पगार ऑनलाईन करण्याचे घोषित केले. मात्र याबाबत ठोस कार्यवाही अद्यापि झालेली नाही. विविध परिपत्रक ग्रामविकास खात्याने जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी, ग्रा.पं. उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच तालुका गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना माहिती संकलित करण्याचे सांगितले आहे. मात्र नगर जिल्ह्यात ठोस कार्यवाही झालेली नाही. 

यामुळे सहा ते आठ महिन्यापासून ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे पगार झालेले नाही. तसेच ग्रामपंचायतीने देखील त्यांच्या अनुदानातून पगार केले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सदर 80 टक्के कर्मचारी गरीब व मागासवर्गीय आहेत. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह पगारावरच चालत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.एप्रिल 2018 पर्यंन्त साठ हजार कर्मचार्‍यांपैकी केवळ चोवीस हजार कर्मचार्‍यांनीच माहिती भरल्याचे संकेतस्थळावर दिसत आहे. यापुर्वी दि.15 एप्रिल ही मुदत देण्यात आली होती. मात्रा आता ती दि.22 मे पर्यंत वाढवून देण्यात आलेली आहे. या काळावधीत ही माहिती भरणे आवश्यक आहे. ऑनलाईन माहिती भरण्याचे अभियान दि.22 मे पर्यंत पुर्ण करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.