Fri, Jan 18, 2019 19:32होमपेज › Ahamadnagar › वकील संघटनेकडून आज कोर्टातील कामकाज बंद

वकील संघटनेकडून आज कोर्टातील कामकाज बंद

Published On: Feb 17 2018 2:05AM | Last Updated: Feb 17 2018 12:48AMनगर : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा शहर बार संघटनेनेे निषेध केला आहे. छिंदम यांचे वकीलपत्र कोणीही घेऊ नये, घेतल्यास त्या वकिलाचे संघटनेचे सदस्यत्व रद्द करण्याचा, तसेच या घटनेच्या निषेधार्थ आज (दि.17) सर्व वकील न्यायालयीन कामकाजात सहभागी न होता, एक दिवसाचा बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शहर बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश ठोकळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा न्यायालय आवारात निषेध सभा घेऊन त्यामध्ये हे ठराव करण्यात आले. यावेळी उपमहापौर छिंदम यांच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. छिंदम यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी वकील संघटनेचे पदाधिकारी कृष्णा झावरे, प्रशांत मोरे, चंदन बारटक्के, अनुराधा येवले यांच्यासह सदस्य उपस्थित होते.