शिर्डी : प्रतिनिधी
शिर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरी गेलेल्या चार टॅ्रक्टरचा शोध लावण्यात शिर्डी पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 37 लाख 62 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक डॉ. सागर पाटील यांनी दिली.
या चोरीबाबत शिर्डी पोलिस ठाण्यात काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. पो. नि. प्रताप इंगळे यांना आपल्या खबर्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार चोरीला गेलेले ट्रॅक्टर हे जामखेड तालुक्यातील कुसळंब, धनगर जवळका, धामणगाव आदी गावांमध्ये अपवार नावाच्या व्यक्तीच्या मध्यस्तीने विकले असल्याचे कळाले. वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखली प्राप्त माहितीनुसार छापे घातले असता या गावांमध्ये चोरीला गेलेले ट्रॅक्टर आढळून आले. पवार याने सदरचे ट्रॅक्टर हे फायनान्स कंपनीने ओढून आणले असल्याची माहिती ट्रॅक्टर विकत घेणार्यांना दिली होती. पोलिसांना मुद्देमाल हस्तगत केला असूून आता ते मुख्य आरोपीच्या शोधात आहेत.