Mon, Sep 24, 2018 18:52होमपेज › Ahamadnagar › नगरमधील चार शाळा अनधिकृत!

नगरमधील चार शाळा अनधिकृत!

Published On: May 18 2018 9:27AM | Last Updated: May 18 2018 9:27AMनगर : प्रतिनिधी

शहरातील इंग्रजी माध्यमाच्या चार प्राथमिक शाळा अनधिकृत असल्याचे महापालिकेच्या शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. या शाळांमधील इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या वर्गात प्रवेश घेवू नये, असे आवाहन शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय मेहेर यांनी केले आहे.

अल हुदा इंग्लिश मीडियम स्कूल (मुकुंदनगर), अली पब्लिक स्कूल (झेंडीगेट), मॉडर्न चिल्ड्रन्स ॲकॅडमी (मुकुंदनगर), आनंद गुरुकूल स्कूल (बोल्हेगाव) या चार शाळांचा यामध्ये समावेश आहे. या शाळांमध्ये प्रवेश घेवू नये, अन्यथा  पाल्याच्या नुकसानीस पालकच जबाबदार राहतील, असे मनपा शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, या बाबतची माहिती जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे कारवाईसाठी सादर करण्यात आली आहे.