होमपेज › Ahamadnagar › अहमदनगरमध्ये बिबट्याच्या हल्‍ल्यात चिमुरडी ठार

अहमदनगरमध्ये बिबट्याच्या हल्‍ल्यात चिमुरडी ठार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

संगमनेर(अहमदनगर) : प्रतिनिधी

झोपडीच्या बाहेर अंगणात शौचास बसलेल्या चार वर्षांच्या चिमुरडीवर बिबट्याने प्राणघातक हल्‍ला केला. या हल्‍ल्यात तिचा मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील मालदड येथे घडली आहे. सोमवारी (दि.२६) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

अश्विनी सीताराम कडाळे (मूळ गाव, विरगाव ता. अकोले) असे बिबट्याच्या हल्‍ल्यात ठार झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण आहे. 

Tags : Ahmednagar, Ahmednagar news, sangamner, girl, leopard, leopard attack


  •