Tue, Mar 26, 2019 20:13होमपेज › Ahamadnagar › भुईकोट किल्ल्याचे भाग्य उजळणार

भुईकोट किल्ल्याचे भाग्य उजळणार

Published On: Jul 13 2018 12:47AM | Last Updated: Jul 12 2018 11:00PMनगर : प्रतिनिधी

विविध ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असणार्‍या भुईकोट किल्ल्याला  पुन्हा ते ऐतिहासिक रुप मिळावे, यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी सैन्यदलाच्या अधिकार्‍यांसमवेत किल्ल्याची  तब्बल अडीच तास पाहणी केली. किल्ला सुशोभिकरण आणि विकासासाठी लवकरच बृहत आराखडा (मास्टर प्लॅन) तयार केला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी काल (दि.12) सायंकाळी 4 वाजता लेफ्टनंट कर्नल एस.के. बारु, कर्नल एस. वर्मा, कर्नल राजबीर सिंग,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश राऊत, जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाने, सहाय्यक नियोजन अधिकारी दातीर यांच्यासह भूईकोट किल्ल्याची पाहणी केली. तत्पूर्वी, जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी लष्कराच्या अधिकार्‍यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालय बैठकही घेतली. 

ऐतिहासिक महत्व अबाधित राखण्यासाठी सर्वात प्रथम किल्ल्याची स्वच्छता मोहिम हाती घेण्यात येणाऱ आहे. किल्ल्याच्या तटबंदीच्या आसपास जी झाडेझुडुपे वाढली आहेत, ज्याने तटबंदीला धोका पोहोचू शकतो, त्यामुळे ती काढून टाकण्यात येणार आहेत. देशातील अनेक मातब्बर स्वातंत्र्य सैनिक ज्या ठिकाणी बंदिवासात होते, त्या लीडर्स ब्लॉकलाही जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी भेट दिली. 

यावेळी इतिहास अभ्यासक  देशमुख यांनी त्यांना या किल्ल्याबाबत विविध घटनांची माहिती दिली. या ऐतिहासिक किल्ल्याचे जतन चांगल्या प्रकारे होण्यासाठी आकर्षक रोषणाईने रात्री किल्ला उजळवला जाणार आहे. किल्ल्याच्या सवार्ंगिण विकासाठी राज्य शासन आणि सैन्यदलाचा विभाग प्रयत्नशील आहे. हा ठेवा जतन करण्याची जबाबदारी नागरिकांचीही असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.