Tue, Jul 23, 2019 11:32होमपेज › Ahamadnagar › कोपरगाव शहरात पाच दुचाकी जाळल्या

कोपरगाव शहरात पाच दुचाकी जाळल्या

Published On: Jan 16 2018 2:08AM | Last Updated: Jan 15 2018 10:18PM

बुकमार्क करा
कोपरगाव : प्रतिनिधी

शहरातील शारदानगर भागातील संजीवनी कारखान्याचे चीफ इंजिनीअर अशोक कचरू टेंबरे यांच्या घराच्या कंपाउंडमध्ये लावलेल्या 5  दुचाकी रविवारच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने रॉकेल टाकून पेटवून दिल्या. या घटनेमुळे या भागात घबराट उडाली आहे. 

दरम्यान, गेल्या एक ते दीड  महिन्यापूर्वी सराफ बाजार भागातही दोन मोटारसायकल अशाच पद्धतीने जाळण्यात आल्या होत्या. त्याचा तपास पोलिसांनी केवळ दोनच दिवसात लावला होता. अशोक टेंबरे व त्यांच्या बंगल्यामध्ये राहणारे  भाडेकरू करणीदान चरण हे रात्री आपल्या गाड्या घराच्या पहरसरामध्ये पार्कीग करून झोपले होते. रात्री 12.45 वाजण्याच्या दरम्यान अचानक धुराचे लोळ व स्फोट झाल्यासारखा आवाज आल्याने हे सर्व जागे झाले. त्यांनी तातडीने या जळत असलेल्या मोटारसायकली विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटेक्यात न आल्याने नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यानंतर आग आटोक्यात आली. या घटनेत  कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र लाखो रूपयांच्या दुचाकी जळून खाक झाल्या.  जळालेल्या मोटारसायकलीमध्ये एमएच 17 एक्स 8403 (टिव्हीएस स्टार), एमएच 17 एके 9439 (पॅशन प्रो), एमएच 17 वाय 2719 (स्कुटी), एमएच 15 सीएक्स 5417 (हिरो मोटो) यापैकी वरील चार गाडया अशोक टेंबरे यांच्या मालकीच्या असून एक गाडी भाडेकरू करणीदान चरण यांच्या मालकीची आहे. घटनास्थळाला शहर पोलिस निरीक्षक दिलीप पारेकर यांनी भेट दिली. या प्रकरणी टेंबरे यांनी पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गाड्या जाळण्याप्रकारणी गुन्हा दाखल केला.या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.