Fri, Jan 18, 2019 04:40होमपेज › Ahamadnagar › पाच आंदोलकांवर दरोड्याचा गुन्हा

पाच आंदोलकांवर दरोड्याचा गुन्हा

Published On: Jun 03 2018 1:11AM | Last Updated: Jun 02 2018 11:40PMसंगमनेर : प्रतिनिधी 

दूध महामार्गावर ओतून टँकर चालकाच्या खिशातून पैसे काढून घेत त्यास मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी पाच आंदोलककर्त्यांवर चालकाच्या तक्रारीवरून दरोड्याचे वाढीव कलम लावून त्यांना अटक केली आहे. 

नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून जाणारा दुधाचा टँकर अडवून त्यातील दूध रस्त्यावर ओतून आंदोलन करून फरार झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी जावून अज्ञात आंदोलकांवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर टँकर चालक  बर्डे यांनी रात्री उशिरा पोलिसांना सांगितले की, त्या आंदोलकांनी माझ्या खिशातून पैसे काढून घेत मला मारहाण केली. त्यानंतर  अनिल बर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अभिजित भाऊसाहेब दिघे (रा. मालदाड रोड), प्रकाश कचरू दातीर (रा.घुलेवाडी), समाधान बाळासाहेब सांगळे (रा.देवाचा मळा), नवनाथ वाळीबा शिंदे (रा. सुकेवाडी), राहुल  प्रभाकर गोडगे (रा. चिंचोली गुरव) या पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या पाचही जणांना न्यालयात उभे केले असता चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास  सहाय्यक पो.नि. गोपाळ उंबरकर करत आहे.