Tue, Apr 23, 2019 19:35होमपेज › Ahamadnagar › छावणी चालकांविरोधात गुन्हे दाखल

छावणी चालकांविरोधात गुन्हे दाखल

Published On: Mar 01 2018 1:46AM | Last Updated: Mar 01 2018 12:01AMशेवगाव : प्रतिनिधी 

सन 2012-13 व 2013-14 या कालावधीत चालविल्या गेलेल्या जनावरांच्या छावणीत अनियमितता केलेल्या छावणी चालक संस्थांवर उच्च न्यायालयाच्या आदेशावरून  पाच मंडलाधिकार्‍यांनी तालुक्यातील 45 संस्थांपैकी 31 छावणी चालक संस्थांवर  शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे तालुक्यातील छावणी चालकांचे धाबे दणाणले आहेत. 

या संस्थांनी छावणी मंजूर करतांना घालून दिलेल्या अटी व शर्तीचे तसेच वेळोवेळी दिलेल्या निर्देशाचे पालन केलेले नाही. या संदर्भात त्यावेळी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली होती. न्यायालयाने घोटाळे बहाद्दर संस्थांवर कारवाई सुरू केली तेव्हा हे संस्थाचालक त्याविरोधात उच्च न्यायालयात गेले होते. मात्र न्यायालयानेच आता त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार छावणीत असलेल्या जनावारांच्या संख्येत तफावती, पंचनामे अद्यावत नसणे, पशुखादय, मिनरल मिश्चर व शिल्लक साठा तसेच हिशोब जुळत नसल्याच्या तक्रारीवरुन भादंवि कलम 1860 च्या कलम 188 नुसार शेवगाव पोलिस ठाण्यात या संबंधी पाच मंडलाधिकार्‍यांनी 31 संस्थाचालकाविरुध्द गुन्हे दाखल केले आहेत. 

चापडगावचे मंडलाधिकारी सुखदेव काशिनाथ कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, विठ्ठल सार्वजनिक ग्रंथालय चापडगाव, कृषी उत्पन्न बाजार समिती शेवगाव संचलित अंतरवली, बोधेगाव मंडलाधिकारी अनिल विश्वनाथ बडे यांच्या फिर्यादीवरून विकासज्योत ग्रामविकास संस्था भुतेटाकळी, कोनोशी. ढोरजळगांव मंडळाधिकारी सर्जेराव माणिक फलके यांच्या फिर्यादीवरून गणेश सहकारी दुध उत्पादक सहकारी संस्था ढोरजळगाव, आखातवाडे विविध कार्यकारी सेवा सोसायटी,  प्रतिभा महिला मंडळ आव्हाणे खुर्दे,  उष:काल बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठाण आखादवाडे, श्रीराम ग्रामिण सहकारी संस्था ढोरजळगांव शे,  गणेश सहकारी सेवाभावी संस्था वाघोली,  मारुतराव घुले पाटील सार्वजनिक वाचनालय आव्हाणे संचलीत ब-हाणपूर, शिवाजीराव वांढेकर सार्वजनिक वाचनालय सामनगांव,  मारुतराव घुले पाटील सार्वजनिक वाचनालय आव्हाणे बुद्रुक, मारुतराव घुले पाटील सार्वजनिक आव्हाणे बुद्रुक,  कानिफनाथ कृषी विज्ञान मंडळ वडुले खुर्द,  स्वामी समर्थ सहकारी दुध संस्था वडुले खुर्द,  गणेश मोटार वाहतूक सहकारी संस्था दिंडेवाडी,  कृषी उत्पन्न बाजार समिती संचलीत लोळेगाव. 

शेवगांव मंडल अधिकारी मारुती रामराव बडे यांच्या फिर्यादीवरून  आनंद प्रतिष्ठाण ठाकूर निमगांव,  शिवछत्रपती सहकारी दूध उत्पादक संस्था, नजिक बाभुळगांव विविध कार्यकारी सेवा संस्था,   श्री स्वामी समर्थ सार्वजनिक वाचनालय अमरापूर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचलित माळीवाडा,  शिवशक्ती ग्रामविकास संस्था मळेगाव, शंभुराजे युवक शैक्षणिक सामाजिक प्रतिष्ठाण गहिलेवस्ती, प्रतिभा महिला मंडळ अमरापूर,  वरुर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, खरडगांव विविध कार्याकरी सहकारी सेवा संस्था, आनंद प्रतिष्ठान ठाकूरनिमगांव संचलित खरडगांव, तसेच भातकुडगांवचे मंडल निरीक्षक सुनिल भाऊसाहेब लवांडे यांच्या फिर्यादीवरून जयभवानी सार्वजनिक वाचनालाय भायगांव, मजलेशहर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, यश बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था भातकुडगांव, नवनाथ ग्राम कृषी विज्ञान मंडळ भायगांव या संस्थांच्या विरुध्द काल गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास सहाय्यक फौजदार बाबासाहेब बोरुडे, पो.ना. राजेंद्र केदार, ज्ञानेश्वर माळवे व संजय बडे हे करीत आहेत.