Thu, Jan 17, 2019 00:53होमपेज › Ahamadnagar › शेतकरी शोषणाच्या विरोधात संघर्ष करा : रघुनाथदादा पाटील

शेतकरी शोषणाच्या विरोधात संघर्ष करा : रघुनाथदादा पाटील

Published On: Jul 03 2018 1:50AM | Last Updated: Jul 03 2018 12:09AMसंगमनेर : प्रतिनिधी

शेतकर्‍यांची होणारी परवड, मुलभूत प्रश्‍न, सततचा दुष्काळ, भांडवलदार धार्जिणी धोरणे, शेतकरी विरोधी कायदे आणि विविध पातळ्यावरील शेतकर्‍यांचे शोषण या विरोधात संघर्ष करण्याचे आवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा  पाटील यांनी केले 

संगमनेर महाविद्यायलाच्या साईबाबा सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. डॉ. सुधीर तांबे, सत्यशोधक चळवळीचे किशोर ढमाले, चित्रपट समीक्षक अनिल म्हमाणे, लेखिका करुणा मीनचेकट, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. के. देशमुख उपस्थित होते.

रघुनाथदादा पाटील म्हणाले, शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी अनेक उपाय, पॅकेजेस  मंजूर होतात तरीही ही व्यवस्थाच बदलत नाही. लोकशाहीच्या मुखवट्याआड बाजारपेठेच्या ताब्यातील भांडवलशाही आहे. सरकार बदलली जातात, समित्या, आयोग स्थापन होतात परंतु शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कोणतीही यंत्रणा कार्यरत नाही. यासाठी संघटीतपणे लढा देण्याची गरज यावेळी त्यांनी व्यक्त केली.प्रास्ताविक करताना दिग्दर्शक डॉ. सोमनाथ मुटकूळे यांनी शेतकर्‍यांच्या वेदना, समस्या यांचा उहापोह केला आणि आपले मत व्यक्त केले. सूत्रसंचालन संदिप वाकचौरे व प्रा. सुशांत सातपुते यांनी केले. तर आभार अंतुन घोडके यांनी मानले.