Thu, May 28, 2020 23:47होमपेज › Ahamadnagar › उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली 

उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली 

Published On: Dec 07 2017 1:34AM | Last Updated: Dec 07 2017 12:38AM

बुकमार्क करा

नेवासा : प्रतिनिधी  

कुकाणा (ता. नेवासा) येथे बेलापूर-परळी लोहमार्गाचे काम सुरू करण्यासाठी  उपोषण सुरू असून, उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असून, कारभारी गरड यांना उपचारासाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान आ. बाळासाहेब मुरकुट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपोषण कर्त्यांशी भ्रमणध्वनीवर चर्चा घडवून आणली. मात्र लेखी आश्‍वासन दिल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, यावर आंदोलक ठाम आहेत. 

उपोषणाचा काल (दि.6) सहावा दिवस होता. दरम्यान आंदोलकांची प्रकृती खालावली असून, कारभारी गरड यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी  दाखल करण्यात आले आहे. तर इतर आंदोलक उपोषणस्थळीच उपचार घेणार, यावर ठाम आहेत. काल नगर येथील आरोग्य विभागाच्या वैद्यकीय पथकाने उपोषणकर्त्यांची तपासणी केली. तसेच त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. गरड यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना काल सायंकाळी पाच वाजता जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे उपोषणकर्त्यांची प्रकृती खालवल्याचा आरोप ग्रामस्थांनी व विविध संघटनानी यावेळी केला.

दरम्यान आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच उपोषणाची माहिती दिली. यावेळी आ. मुरकुटे यांनी मुख्यमंत्र्यांचा भ्रमणध्वनीवरून उपोषणकर्त्यांशी संपर्क करून दिला. मात्र उपोषणकर्त्यांनी ठोस लेखी आश्‍वासन दिल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचे  यावेळी सांगितले. 

उपोषणकर्ते रितेश भंडारी, कारभारी गरड, महेश पुंड, निसार सय्यद, प्रकाश देशमुख, सुरेश नरवणे उपोषणावर ठाम आहेत. तसेच हे उपोषण आणखी तीव्र करण्यासाठी कुकाणा व परिसरातील ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांनी साखळी उपोषणही चालू केले आहे. पहिल्या दिवशी  हिंदवी प्रतिष्ठानचे विशाल निकम, सलीम शहा, राजेंद्र खराडे, किरण शिंदे, शिवाजी कर्डिले, राजेंद्र म्हस्के, भानुदास मिसाळ, रमेश सोनवणे, सोमनाथ कचरे,  काका नरवणे, समीर शहा, शुभम कदम, शिवाजी म्हस्के, लतिफ शेख,  डॉ. महेशराजे देशमुख आदींनी  साखळी उपोषणाला बसून पाठिंबा दिला आहे. बाळासाहेब देठे, लखन गरड, ज्ञानेश्‍वर फसले, माजी सभापती भाऊसाहेब पटारे, माजी उपसभापती तुकाराम काळे, जनार्दन जाधव, रामकृष्ण कांगुणे, जीवनराव वंजारे, शंकरराव भारस्कर आदींनी उपोषणस्थळी भेट दिली.