Sun, May 26, 2019 12:37होमपेज › Ahamadnagar › ..शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत : वामन मेश्राम

..शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत : वामन मेश्राम

Published On: May 27 2018 1:16AM | Last Updated: May 26 2018 11:21PMसंगमनेर : प्रतिनिधी 

राष्ट्रवादीचे नेते  शरद पवार हे केंद्रात कृषीमंत्री असताना सुद्धा शेतकरी आत्महत्या सुरूच  होत्या. आता ईव्हीएम मशीनला दिवसेंदिव  महत्त्व वाढत चालले आहे. केंद्रात काँग्रेसची सत्ता गेली की भाजपची सत्ता येते आणि भाजपाची सत्ता गेली की काँग्रेसची सत्ता येते. हे चक्र जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबणार नसल्याचा आरोप बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केला.

बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम संगमनेरात शेतकरी परिषदेसाठी आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मेश्राम म्हणाले की, निवडणुकांमध्ये ब्लॅट पेपरचे मशीन जाऊन ईव्हीएमचे  मशीन आल्यामुळे केंद्रात काँग्रेसची सत्ता गेली. भाजपची सत्ता येते आणि भाजपाची सत्ता गेली की काँग्रेसची सत्ता  येते, असे चक्र कायमच चालू असल्यामुळे  शेतकर्‍यांचे प्रश्‍न कायम निर्माण होत होते.

गेल्या आठ ते दहा वर्षांपासून निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनचा वापर सुरु झाला. त्यामुळे आता आमदार खासदार हे निवडण्याचे काम ग्रामीण भागातील शेतकरी न करता ईव्हीएम मशीनचा करत असल्याचा आरोप करून भाजप व काँग्रेस हे दोन्हीही पक्ष ईव्हीएम मशीनच्या बाबती काहीच बोलत नाही . यावरून काँग्रेस व भाजप यांच्यात समझोता असल्याचा आरोप त्यांनी केला. या ईव्हीएम मशीनचा वापर होत असल्यामुळे या दोन्ही पक्षाचे शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍याच्या आत्महत्या वाढत आहेत. 

जर काँग्रेसला  निवडणुकात ईव्हीएम मशीन  ऐवजी ब्लेट पेपरद्वारे घ्याव्यात  असे वाटत असेल त्यांनी रस्त्यावर उतरून या ईव्हीएम मशीनच्या विरोधात आंदोलन करावे असा सल्ला त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना दिला. 2019 च्या निवडणुकीत आपण पुन्हा  ईव्हीएम मशीनच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे सांगितले.

राष्ट्रवादीशी संगनमत करून भुजबळ तुरुंगात

राज्यात छगन भुजबळ हे ओबीसीचे एकमेव नेते असल्यामुळे  ते तुरुंगात गेले तर ती सर्व ओबीसींचे मते आपल्याकडे  आकर्षित होतील, अशी भावना  भाजपाची होती. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आक्रमक होत  भाजप राज्यात  सत्तेवर आले. त्यानंतर आपली प्रतिमा मालिन होणार नाही म्हणून भाजपने  शरद पवारांशी संगनमत करून अजित पवारांना बाजूला ठेवत छगन भुजबळांनी तुरुंगात टाकल्याचा आरोप वामन मेश्राम यांनी केला.