Tue, Jun 25, 2019 15:49होमपेज › Ahamadnagar › मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेस पाजले दूध!

मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेस पाजले दूध!

Published On: Jul 19 2018 1:36AM | Last Updated: Jul 19 2018 12:00AMनगर : प्रतिनिधी

दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादक शेतकर्‍यांचे आंदोलन पेटलेले असताना, त्यामध्ये आता राज्यातील सत्ताधारी शिवसेनेनेही उडी घेतली आहे. नगर तालुका शिवसेनेच्या वतीने मार्केटयार्ड चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेस दूध पाजून आंदोलन करण्यात आले. 

यावेळी नागरिकांना मसाला दुधाचे मोफत वाटप करण्यात आले. या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, तालुका पंचायत समितीचे सभापती रामदास भोर, संदीप गुंड, प्रकाश कुलट, रामदास पोटे, किरण वायन, गजानन पुंड, जीवा लगड, आकाश आठरे, छबुराव टकले आदी सहभागी झाले होते.