Thu, Jul 18, 2019 00:09होमपेज › Ahamadnagar › कर्जास कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

कर्जास कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

Published On: Jan 22 2018 1:26AM | Last Updated: Jan 21 2018 10:44PMकर्जत : प्रतिनिधी 

कर्जत तालुक्यातील पठारवाडी येथील देविदास बाबा पठाडे (वय 45) यांनी कर्जास कंटाळून राहत्या घरामध्ये गळफास घेतला. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, पत्नी, आई असा परिवार आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, देविदास बाबा पठाडे हे अल्पभूधारक शेतकरी होते. या वर्षीही जमीन हालकी असल्याने फारसे पीक हाती आले नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीत आले होते. घरची गरिबी, न फिटणारे कर्ज, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घरखर्च भागत नसल्याने पठाडे निराश झाले होते.

त्यात त्यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. गावामध्ये सुरू असलेले कीर्तन संपल्यानंतर ही घटना उघडकीस आल्याने गावकर्‍यांनी पठाडे यांच्या घराकडे धाव घेतली. तसेच त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.