Thu, Jul 18, 2019 06:17होमपेज › Ahamadnagar › बनावट ‘फेसबुक’ खात्यावरून दमदाटी

बनावट ‘फेसबुक’ खात्यावरून दमदाटी

Published On: Dec 07 2017 1:34AM | Last Updated: Dec 07 2017 12:42AM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

‘फेसबुक’वर तरूणीच्या नावे बनावट खाते तयार करून तिच्याच भावाला धमकीचे मेसेज पाठविल्याने सायबर पोलीस ठाण्यात सातारा येथील युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शेवगाव येथील युवतीने फिर्याद दिलेली आहे.

आकाश शरद सोनटक्के (रा. संभाजीनगर, सातारा) हे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत सायबर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सोनटक्के याने शेवगाव तालुक्यातील युवतीच्या नावे फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करून तिचा फोटो वॉलपेपरवर ठेवला़ या अकाऊंटच्या माध्यमातून त्याने 30 ऑगस्ट रोजी तरूणीच्या भावाला मेसज करून ‘तू तुझ्या बहिणीचे लग्न कुठेही ठरविण्याचा प्रयत्न केला, तर मी ते लग्न मोडून टाकेल.

तसेच ज्या मुलाशी तू तुझ्या बहिणीचे लग्न ठरवशील, त्याला मी मारून टाकेल,’ अशी धमकी दिली. याप्रकरणी सोनटक्के याच्याविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरिक्षक सुनील पवार हे करीत आहेत.