Thu, Aug 22, 2019 12:56होमपेज › Ahamadnagar › अध्यात्मातून देश समर्थ व्हावा : मोहन भागवत

अध्यात्मातून देश समर्थ व्हावा : मोहन भागवत

Published On: Aug 23 2018 1:26AM | Last Updated: Aug 22 2018 11:49PMशिर्डी : प्रतिनिधी

भारत देशात नाना प्रकारच्या भाषा, प्रांत, जाती, धर्म असून प्रत्येक धर्म, जातीत परंपरेने साधू संत असतात. त्यांच्या माध्यमातून अध्यात्माचा मार्ग सापडत असतो.अध्यात्माच्या या मार्गातून देश समर्थशाली होऊन जगाला प्रेम व सौदर्यपूर्व वातावरण निर्माण करेल, अशी भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली. 

शिर्डीत आयोजित 171 व्या अखंड हरिनाम सप्ताहात प्रमुख मान्यवर म्हणून ते बोलत होते. तत्पूर्वी साईदर्शन घेतल्यानंतर त्यांचा संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. 
याप्रसंगी व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ, तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, नानाजी जाधव, साई संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, खा. सदाशिव लोखंडे, आ. मोनिका राजळे, आ. स्नेहलता कोल्हे, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे, नगराध्यक्षा योगिता शेळके, नागरध्यक्षा ममता पिपाडा आदींसह मान्यवर उपस्थित होते.

संघचालक भागवत म्हणाले की,   जे आपल्याला पाहिजे, ते दुसर्‍याचे हिरावून न घेता मिळाले पाहिजे, ती खरी कुशलता असल्याचे  अध्यात्मातून सांगितले जाते. संत, साधूच्या माध्यमात येऊन आपला अध्यात्मिक विकास केला पाहिजे. त्यातून विश्वातील प्रत्येक मनुष्य सुखी व्हावा, यासाठी प्रयत्न केला पाहिजे, इतका समर्थ भारत देश व्हावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.आपल्या जातीधर्माचा कलयुगात साधा सोपा मार्ग आहे, तो अंगिकारला पाहिजे. आपल्या समाजातील संतांनी स्वतःच्या समाजाबरोबर संघर्ष करून जनजागृती आणली असल्याचे गौरवोद‍्गार त्यांनी काढले.