Mon, Aug 19, 2019 01:08होमपेज › Ahamadnagar › तीनही ग्रामपंचायतींवर विखेंचाच बोलबाला

तीनही ग्रामपंचायतींवर विखेंचाच बोलबाला

Published On: Mar 01 2018 1:46AM | Last Updated: Feb 28 2018 11:53PMराहाता : प्रतिनिधी

तालुक्यातील पुणतांबा, रुई, कनकुरी या तिन्ही ग्रामपंचायतींच्या  निवडणुकांत ना. विखे पाटील यांच्या गटाने वर्चस्व सिद्ध केल्याने तालुक्यात पुन्हा एकदा सबकुछ विखे असे चित्र पाहावयास मिळाले. 

राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाणार्‍या पुणतांबा ग्रामपंचायतीत सत्तांतर घडवित ना. विखे गटाने विजयाचा झेंडा फडकावला आहे. मागील पंचवार्षिकमध्ये ही ग्रामपंचायत कोल्हे गटाकडे होती. कोल्हे व काळे गटाला या निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. रुई व कनकुरी या ग्रामपंचातींच्या निवडणुकांमध्ये विखे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने निवडणुकीसाठी रिंगणात उभे होते. त्यामुळे त्याठिकाणी विखे गटानेच बाजी मारली.

रुई ग्रामपंचायतीमध्ये ना. राधाकृष्ण विखे पाटील गटाचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. या ठिकाणी विखे पाटील गटाचे उमेदवार निवडणुकीत आमने सामने उभे होते. या ठिकाणी भाऊराव शिरसाठ व फकिरा लोढा या गटाचे संदीप बाबासाहेब वाबळे यांना सरपंचपदासाठी 1340 मते मिळून ते विजयी झाले. तर रावसाहेब देशमुख यांच्या गटाचे सरपंचपदाचे उमेदवार अभय विजय वाबळे यांना 703 मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार गोविंद भडांगे यांना 831 मते मिळाली. त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. रुईमध्ये भाऊराव शिरसाठ यांच्या गटाला 11 तर रावसाहेब देशमुख यांच्या गटाला 2 जागा मिळाल्या. 

ग्रामपंचायत रुई विजयी उमेदवारः - अशोक कोळगे (489), सीताराम कडू (461), सुचिता देशमुख (412), विजय गायकवाड (283), वृशाली सुराळे (328), योगेश जपे (337), विमल राठोड (353), मीराबाई वाबळे (314), सचिन वाबळे (299), लताबाई गोसावी (295), कविता जाधव (287), ज्ञानेश्वर वाबळे (158), रिना धनवटे (347).

कनकुरी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जय हनुमान जनसेवा परिवर्तन मंडळाचे ज्ञानेश्वर डांगे यांना सरपंचपदासाठी 579 मते मिळून ते विजयी झाले. त्याठिकाणी त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब डांगे यांना 574 मते मिळाली. त्यांना 5 मतांनी पराभव पत्कारावा लागला. याठिकाणी सरपंचपदासाठी काट्याची लढत झाली. या निवडणुकीमध्ये सदस्य पदासाठी ज्ञानेश्वर डांगे यांचे गटाला 4 तर बाबासाहेब डांगे यांचे गटाला 5 जागा मिळाल्या.

ग्रामपंचायत कनकुरी विजयी उमेदवारः   सखाराम माळी  (176), अभिजित कालेकर (173), सीनाबाई डांगे (192), शिवाजी डांगे (216), रंजना बनसोडे (236), सुरेखा डांगे (230), विनायक जपे (246), आरती गोरे (245), गंगाताई डांगे (245).