Mon, Dec 17, 2018 15:33होमपेज › Ahamadnagar › प्रभाग ‘३२ ब’ साठी ६ एप्रिलला निवडणूक

प्रभाग ‘३२ ब’ साठी ६ एप्रिलला निवडणूक

Published On: Mar 08 2018 1:49AM | Last Updated: Mar 07 2018 10:45PMनगर : प्रतिनिधी

माजी महापौर संदीप कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आल्यानंतर रिक्‍त झालेल्या केडगाव उपनगरातील ‘32 ब’च्या जागेवर प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 6 एप्रिल रोजी मतदान होणार असून  7 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या प्रभागापुरतीच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

मागील महिन्यात आयोगाने प्रभाग 32 व 34 मधील दोन जागांच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, प्रभाग 34 चे नगरसेवक संजयकुमार लोंढे यांचे पद रद्द करण्याच्या विभागीय आयुक्‍तांच्या आदेशाला राज्यमंत्र्यांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे केवळ प्रभाग ‘32 ब’च्या एका जागेसाठीच निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

13 मार्च रोजी निवडणूक कार्यक्रम प्रसिध्द केला जाणार आहे. 13 ते 20 मार्च या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत उमेदवारी अर्ज मिळणार आहेत. तर याच कालावधीत दाखल करता येणार आहेत. 20 मार्च रोजी दुपारी वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 21 मार्च रोजी छाननी होऊन त्यानंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. त्यानंतर 23 मार्चपर्यंत उमेदवारी माघारीसाठी मुदत देण्यात आली आहे. 24 मार्चरोजी चिन्ह वाटप होवून त्याच दिवशी अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल. 6 एप्रिलला मतदान होऊन 7 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे राजकीय हालचालींनाही वेग आला आहे.