होमपेज › Ahamadnagar › निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू

निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू

Published On: Dec 15 2017 2:42AM | Last Updated: Dec 14 2017 11:03PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. सदस्यपदासाठी 1 हजार 619 तर सरपंचपदासाठी 204 असे एकूण 1 हजार 823 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.त्यामुळे प्रचाराची रणधुमाळी आता जोरात सुरु होणार आहे.

माहे जानेवारी व फेब्रुवारी 2018 मध्ये मुदत संपणार्‍या 67 ग्रामपंचायतींसाठी 26 डिसेंबरला निवडणुका होत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल (दि.14) शेवटचा दिवस होता.सदस्यपदासाठी भरण्यात आलेल्या एकूण उमेदवारांपैकी  1 हजार 113 उमेदवारांनी तर सरपंचपदासाठी दाखल झालेल्या एकूण अर्जांपैकी  269 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे निवडणूक रिंगणात आता एकूण 1 हजार 823 उमेदवार आहेत.या उमेदवारांना निवडणूक चिन्हे देखील वाटप झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आता गावोगावी प्रचाराची रणधुमाळी सुरु होणार आहे.