Sat, Jul 20, 2019 15:06होमपेज › Ahamadnagar › आठजण पोलिस महासंचालक पदकाचे मानकरी

आठजण पोलिस महासंचालक पदकाचे मानकरी

Published On: Apr 26 2018 1:24AM | Last Updated: Apr 26 2018 12:00AMनगर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील चार अधिकार्‍यांसह 8 जणांना पोलिस महासंचालकांचे पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यात सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील पवार, शिर्डीचे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे, राखीव उपनिरीक्षक सत्यवान माशाळकर, पोलिस उपनिरीक्षक प्रसाद भिंगारे आदींचा समावेश आहे. 

चार अधिकार्‍यांसह पीसीआरचे सहाय्यक फौजदार अल्ताफ शेख, वाचक शाखेतील दिलीप सोनुले, पोलिस हवालदार अंबादास शिंदे, राजेंद्र गोडगे यांनाही हे पदक जाहीर करण्यात आलेले आहे. पोलिस निरीक्षक पवार व इंगळे यांना क्‍लिस्ट व थरारक बहुचर्चित गुन्ह्यांची उकल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्याबद्दल ‘डीजी’ पदक मिळाले आहे. पवार यांनी दिवे आगार येथे खुनासह मूर्ती चोरीप्रकरण, नैना पुजारी बलात्कारासह खून, नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे खून प्रकरण, जर्मन बेकरी, फरासखाना बॉम्बस्फोटाच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजाविली.

तसेच कोट्यवधींचे ऑनलाईन फ्रॉड करणार्‍या टोळ्या जेरबंद केल्या. शिर्डीचे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांनीही अनेक गुन्ह्यांच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजाविली आहे. पोलिस शौर्यपदक मिळाल्याने भिंगारे यांना, तर राखीव उपनिरीक्षक माशाळकर यांच्यासह इतर अधिकार्‍यांना 15 वर्षांच्या उत्तम सेवेबद्दल, तसेच उत्कृष्ट तपासाबद्दल पोलिस महासंचालकांचे पदक मिळाले आहे.