Tue, Nov 20, 2018 13:38होमपेज › Ahamadnagar › ‘पीसीपीएनडीटी’ प्रभावीपणे राबवा

‘पीसीपीएनडीटी’ प्रभावीपणे राबवा

Published On: Jan 14 2018 1:51AM | Last Updated: Jan 13 2018 11:25PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

प्रसूतीपूर्व गर्भलिंग निंदान प्रतिबंधक कायद्याची (पीसीपीएडीटी) प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी अंमलबजावणी यंत्रणा, समुचित प्राधिकारी यांनी स्वताहून पुढाकार घेतला पाहिजे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी म्हणजे गर्भातील एका जीवाला जीवदान देणे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ उदय वारुंजीकर यांनी केले. 

जिल्हा रुग्णालयात शनिवारी पीसीपीएनडीटी कार्यशाळा आयोजित कऱण्यात आली होती. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.टी. गाडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.बी. बेलंबे, डॉ. डी.टी. धोंडे, शैलजा निसळ, डॉ. अनिल कुर्‍हाडे आदी विविध मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.

वारुंजीकर म्हणाले, गर्भलिंगनिदान रोखण्यासाठी अतिशय प्रभावी असा हा कायदा आहे. या कायद्याने समुचित प्राधिकार्‍यांना खूप मोठे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. गर्भलिंगनिदानाला प्रतिबंध तसेच त्याचे नियमन करणे आणि सोनोग्राफी मशीन्स चालवणार्‍या रेडिओलॉजिस्टनी अथवा संबंधित तंत्रज्ञांनी त्यांना दिलेल्या विहित चौकटीतच काम कऱणे आवश्यक आहे. तसे काम होते की नाही, हे पाहण्याची जबाबदारी समुचित प्राधिकार्‍यांची असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कायद्याच्या विविध कलमांनुसार समुचित प्राधिकार्‍याला यासंदर्भातील कागदपत्रे दाखल करणे, सर्च वॉरंट जारी कऱण्याचेसुद्धा अधिकार आहेत. गर्भलिंगनिदान रोखण्यासाठी आणि प्रभावी व सक्त अंमलबजावणीसाठी या कायद्याने मोठे अधिकार या तपासणी यंत्रणेला दिल्याचे अँड. वारुंजीकर यांनी स्पष्ट केले.