Wed, Aug 21, 2019 15:22होमपेज › Ahamadnagar › संगमनेर : घारगाव व परिसराला पुन्हा भूकंपाचे धक्के 

संगमनेर : घारगाव व परिसराला पुन्हा भूकंपाचे धक्के 

Published On: Aug 21 2018 1:22PM | Last Updated: Aug 21 2018 1:22PMसंगमनेर : प्रतिनिधी

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव परिसराला पुन्हा भूकंपाचे धक्के बसले. आज मंगळवारी सकाळी ८:३३ वाजेच्या सुमारास भूकंपाचा पहिला सौम्य धक्का बसला. त्यानंतर सहा धक्के जाणवले आहेत.

भूकंपाच्या धक्क्यामुळे घरातील भांडी खाली पडली, तर नागरीक घराबाहेर रस्त्यावर आले. हा धक्का मुळा खोऱ्यातील घारगाव, बोरबन, कुरकुंडी आणि आंबी खालसा या गावांना जाणवला. या परिसरातील धक्क्यांची तीव्रता २.८ रिश्टर स्केल असल्याचे नाशिकच्या मेरी संस्थेचे भूवैज्ञानिक चारुलता चौधरी यांनी सांगितले. सातत्याने भूकंपाचे सौम्य धक्के बसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.