अहमदनगर : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी भाजपचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याला अहमदनगर पोलिसांनी अटक केली आहे.
श्रीपाद छिंदम कारमधून जात असताना, नागरिकांनी त्याचा पाठलाग केला. त्यानंतर कारमधून पळून जावून छिंदम सोलापूर रोड परिसरातील शिराडोण शिवारातील अंधारात लपला. त्यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं छिंदमला अटक केली.