होमपेज › Ahamadnagar › नगर :उपमहापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर!

नगर :उपमहापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर!

Published On: Feb 26 2018 12:20PM | Last Updated: Feb 26 2018 12:20PMनगर : प्रतिनिधी

अहमदनगर उपमहापौर निवडणूकीचा ५ मार्च रोजी होणारा कार्यक्रम पीठासीन अधिकारी अभय महाजन यांनी जाहीर केला आहे. 

२७ फेब्रूवारीपासून १ मार्चपर्यंत इच्छुकांचे उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. नगरसचिव कार्यालयात अर्ज उपलब्ध असून तेथेच स्वीकारले जाणार आहेत. सभा सुरू झाल्यानंतर प्राप्त अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर माघारीसाठी १५ मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. त्यानंतर गरज पडल्यास मतदान घेतले जाणार आहे.

दरम्यान निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून उद्यापासून अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. त्यामुळे मनपातील राजकीय वातावरणात तापणार आहे. सद्यस्थितीत सदरची जागा भाजपकडे असून भाजप उमेदवार देणार का? याकडे लक्ष लागले आहे.