होमपेज › Ahamadnagar › नगरच्या छिंदमचा मुक्काम येरवड्यात

नगरच्या छिंदमचा मुक्काम येरवड्यात

Published On: Feb 17 2018 8:48PM | Last Updated: Feb 17 2018 8:48PMअहदनगर : प्रतिनिधी

शिवाजी महाराजांबद्दल अपशब्‍द वारणारा भाजपचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याला पुण्याच्या येरवडा कारागृहात हलविण्यात आले आहे. त्याचा काही दिवस येरवड्यातच मुक्काम राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

छिंदम याच्या वक्तव्यावरून नागरिकांच्या भावना तीव्र असल्याने न्यायालय आवारात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. ही बाब लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने गांधीगिरी करत सरकारी वकिलांच्या माध्यमातून न्यायालयाकडे सकाळी लवकर कामकाज घेण्याची विनंती केली. ही बाब अतिशय गोपनीय ठेवण्यात आली. त्यानुसार सकाळी लवकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, तोफखानाचे निरीक्षक सुरेश सपकाळे आदींनी निवडक कर्मचार्‍यांच्या बंदोबस्तात छिंदम याला न्यायालयात आणले.

न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर तत्काळ त्याला सबजेलमध्ये हलविण्यात आले. त्‍यानंतर रात्री उशिरा त्‍याला येवडा कारागृहात हलविण्यात आले. 

संबधित बातम्याः

अहमदनगर : छिंदम याचा राजीनामा नाहीच

सबजेलमध्ये छिंदमला मारहाण झाल्याची अफवा

नगर: छिंदमची रवानगी सबजेलमध्ये!