Wed, Apr 24, 2019 15:29होमपेज › Ahamadnagar › उपमहापौर श्रीपाद छिंदम अखेर पोलिसांच्या ताब्यात

उपमहापौर श्रीपाद छिंदम अखेर पोलिसांच्या ताब्यात

Published On: Feb 17 2018 2:05AM | Last Updated: Feb 17 2018 2:05AMनगर : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर दिवसभर फरार असलेल्या उपमहापौर श्रीपाद  छिंदमला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. जमावाच्या मारापासून वाचण्यासाठी पोलिसांच्या गाडीकडे धावत आलेल्या छिंदम यांना नगर-सोलापूर रस्त्यावरील शिराढोण परिसरात पोलिसांनी ताब्यात घेतले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सकाळपासून आक्षेपार्ह वक्तव्य करणारे उपमहापौर छिंदम नेमके आहेत कुठे? याचा पोलिसांसह नागरिकही शोध घेत होते. सायंकाळी 7.30 च्या सुमारास छिंदम यांनी पोलिसांशी संपर्क साधून घटनेची जबाबदारी स्वीकारली. स्वतःहून पोलिसांसमोर हजर होण्याची तयारी त्यांनी दाखविली. सोलापूर रस्त्यावरील वाकोडी फाटा येथे छिंदम थांबले होते. पोलिस त्यांना ताब्यात घेण्यासाठी येत असतांनाच छिंदम यांची माहिती काही स्थानिक नागरिकांना मिळाली होती. नागरिकांनी त्यांना पहिले असता त्यांचा पाठलाग सुरु केला.

संतप्त झालेले नागरिक अंगावर धावून येत असल्याचे पाहताच छिंदम यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. समोरून येत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, आक्षेपार्ह वक्तव्यानंतर घर व दुकानावर दगडफेक झाल्याने छिंदम यांनी नातेवाईकांना व कुटुंबियांना संरक्षण देण्याची मागणी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.

संबंधित बातम्या : 

शिवरायांबाबत उपमहापौरांचे आक्षेपार्ह वक्तव्य!

सकल मराठा समाजाने केला छिंदम यांचा निषेध

पाथर्डीत एसटी बसच्या काचा फोडल्या

छिंदम यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

उपमहापौरांचे घर, ऑफीसवर दगडफेक!

शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा छिंदम अटकेत(व्हिडिओ)

मुख्यालये सोडू नका

छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

नगर : उपमहापौरांच्या घरावर दगडफेक; तणाव (video)

उपमहापौरांना मनपात पाय ठेवू देणार नाही

वकील संघटनेकडून आज कोर्टातील कामकाज बंद

विरोध असूनही गांधींनी प्रतिष्ठा पणाला लावली!