Tue, Mar 26, 2019 01:33होमपेज › Ahamadnagar › उपमहापौरांचे घर, ऑफीसवर दगडफेक!

उपमहापौरांचे घर, ऑफीसवर दगडफेक!

Published On: Feb 17 2018 2:05AM | Last Updated: Feb 17 2018 2:05AMनगर : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर संपूर्ण शहरात शिवभक्तांचा उद्रेक झाला आहे. भारतीय जनता पार्टीलाही याची झळ बसली असून छिंदम यांचे घर, ऑफीससह पालकमंत्री राम शिंदे, खा. दिलीप गांधी, सुवेंद्र गांधी यांची संपर्क कार्यालये, गांधी मैदान येथील पक्ष कार्यालयालावर संतप्त जमावाकडून काल (दि.16) दगडफेक करण्यात आली. यावेळी छिंदम यांच्यासह भाजपच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

उपमहापौर - मनपा कर्मचार्‍यांमधील संवाद व त्यामधील शिवाजी महाराजांबाबत करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची ऑडियो क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातूनच संतप्त प्रतिक्रीया उमटल्या. शिवसेनेने रस्त्यावर उतरून उपमहापौरांचा निषेध करत तोफखाना पोलिस ठाणे गाठले. उपनेते अनिल राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, अनिल शिंदे यांनी पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांची भेट घेवून फिर्याद दाखल केली. तसेच कायदा व सुव्यवस्था राखायची असेल तर छिंदम यांना अटक करुन शिवजयंती होईपर्यंत बाहेर सोडून नका, अशी मागणी केली. त्यानंतर शिवसैनिकांनी दिल्लीगेट येथे छिंदम यांच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी केली.

दरम्यानच्या काळात शिवप्रेमी व शिवभक्त संघटनांनी उपमहापौर छिंदम यांचे हॉटेल, कार्यालय व घरावर हल्ला चढवत दगडफेक केली. त्यांच्या वाहनांचीही यावेळी तोडफोड करण्यात आली. उपमहापौरांच्या महापालिकेतील दालनावर असलेल्या नामफलकांची मोडतोड करण्यात आली. भाजपाच्या गांधी मैदान येथील कार्यालयावर दगड फेकण्यात आले. पालकमंत्री राम शिंदे व खा. दिलीप गांधी यांच्या कार्यालयांवरही जमावाकडून किरकोळ दगडफेक झाली. नगरसेवक सुवेंद्र गांधी यांचे माणिक चौकातील संपर्क कार्यालयही टार्गेट करण्यात आले. ठिकठिकाणी निषेध, पुतळे जाळणे, दुचाकीवर रॅली काढून निषेध यामुळे संपूर्ण दिवसभर शहरात तणावाचे वातावरण होते. पोलिस प्रशासनाने सर्वत्र पोलिस बंदोबस्त वाढविला आहे.

संबंधित बातम्या : 

शिवरायांबाबत उपमहापौरांचे आक्षेपार्ह वक्तव्य!

सकल मराठा समाजाने केला छिंदम यांचा निषेध

छिंदम यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

उपमहापौरांचे घर, ऑफीसवर दगडफेक!

शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा छिंदम अटकेत(व्हिडिओ)

मुख्यालये सोडू नका

छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

नगर : उपमहापौरांच्या घरावर दगडफेक; तणाव (video)

उपमहापौरांना मनपात पाय ठेवू देणार नाही

वकील संघटनेकडून आज कोर्टातील कामकाज बंद

विरोध असूनही गांधींनी प्रतिष्ठा पणाला लावली!