Fri, Sep 21, 2018 07:36होमपेज › Ahamadnagar › डेंग्यू सदृश आजाराने बालिकेचा झाला मृत्यू

डेंग्यू सदृश आजाराने बालिकेचा झाला मृत्यू

Published On: Sep 02 2018 1:09AM | Last Updated: Sep 02 2018 1:09AMश्रीगोंदा : प्रतिनिधी 

श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील तन्वी रविंद्र दरेकर (वय 10 वर्षे) या बालिकेचा डेंग्यू सदृश्य आजाराने मृत्यू झाला. 31 ऑगस्टला पहाटे पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना तिचे निधन झाले.

तन्वीला ताप आल्याने तिला उपचारासाठी श्रीगोंदा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून दौंड आणि नंतर पुणे येथील खाजगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. दौंड येथे केलेल्या रक्त तपासणी दरम्यान डेंग्यूची लक्षणे आढळून आली होती. मात्र पुणे येथे उपचार केल्यानंतर लक्षणे नसल्याचे स्पष्ट झाले होते. गेल्या आठवडाभरापासून तिची मृत्यूशी झुंज सुरु होती. डॉक्टरांनी तिला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. हिरडगाव येथे शोकाकूल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

शेवटचे संचलन 

तन्वी ही इयत्ता चौथीमध्ये शिकणारी चिमुकली होती. वर्गात अतिशय हुशार असणार्‍या तन्वीने शाळेत पार पडलेल्या स्वातंत्रदिनाच्या कार्यक्रमात संचलन केले होते. संचलन करतानाचे तिचे छायाचित्र दिवसभर सोशल मीडियावर झळकत होते. तिचे हे शेवटचे संचलन ठरले, असे सांगताना अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाही.