Mon, Aug 19, 2019 11:06होमपेज › Ahamadnagar › छिंदमला सभेस येण्यास मज्जाव करण्याची मागणी

छिंदमला सभेस येण्यास मज्जाव करण्याची मागणी

Published On: Aug 03 2018 1:33AM | Last Updated: Aug 02 2018 11:49PMनगर : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणार्‍या छिंदमला पोलिसांनी संरक्षण दिल्यामुळेच तो सभागृहात येवू शकला. पोलिसांनी त्याच्या उपस्थितीबाबत कळविणे आवश्यक होते. त्याच्या उपस्थितीमुळे कामकाजात अडथळा निर्माण होवून सभा तहकूब करण्याची वेळ आल्याची नाराजी शिवसेनेने पोलिस अधिक्षकांकडे व्यक्‍त केली. शुक्रवारच्या सभेत त्याला येण्यास मज्जाव करावा, अशी मागणीही शिवसेनेने केली आहे.

महापौर सुरेखा कदम, उपमहापौर अनिल बोरुडे, सभागृह नेते गणेश कवडे, गटनेते संजय शेंडगे, नगरसेवक अनिल शिंदे, छाया तिवारी आदींसह नगरसेवक, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पोलिस संरक्षणात छिंदमला मनपात आणण्याबाबत कळविण्यात का आले नाही? असा सवाल करत छिंदम येवून गेल्यामुळे सभागृहात गोंधळ होऊन सदस्य आक्रमक झाले. परिणामी, कामकाजात अडथळा येवून सभा तहकूब करावी लागली. पुन्हा पोलिस संरक्षणात त्याला आणण्याचा प्रयत्न केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवू शकतो. त्यामुळे शुक्रवारी होणार्‍या सभेत त्याला येण्यास मज्जाव करावा, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने एसपी शर्मा यांच्याकडे केली आहे.