Mon, May 20, 2019 22:03होमपेज › Ahamadnagar › शेतकर्‍यांना ‘समृद्धी’ प्रमाणे मोबदला द्या!

शेतकर्‍यांना ‘समृद्धी’ प्रमाणे मोबदला द्या!

Published On: May 20 2018 1:40AM | Last Updated: May 20 2018 12:18AMनगर : प्रतिनिधी

पुणे - अहमदनगर- औरंगाबाद या 235 किमी रस्त्याचे आठपदरी रस्त्यात रुपांतर होणार आहे. त्यामुळे रस्त्यावरील अनेक शेतकर्‍यांची जमीन यात संपादन केली जाणार आहे. छोट्या मोठ्या गावातील रस्त्यावर वसलेली बाजारपेठ उध्वस्त होणार आहे. यामुळे अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी जाणार आहे. त्यामुळे या शेतकर्‍यांना समृद्धी महामार्गाच्यावेळेस दिल्याप्रमाणे भरपाई देण्याची मागणी अभिजीत लुणिया यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील केली आहे.

आठपदरी महामार्ग हा पश्‍चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत भुषणावह बाब आहे. गेल्या वर्षभरापूर्वी हाच महामार्ग डीएमआयसी (दिल्ली मुंबई इंडस्ट्रीअल कॉरीडॉर) अंतर्गत आठपदरी होणार होता. तोच मार्ग आता राष्ट्रीय महामार्ग झाल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मार्फत होणार आहे. या रस्त्याचे जवळपास 60 मिटर म्हणजे 150 फुट रस्त्याच्या दोन्ही बाजुने जमिनीचे भुसंपादन होणार आहे. 

अनेक मोठ्या बाजारपेठा बाह्यवळण रस्ते करुण वाचवता येणार आहेत. ज्या छोट्या गावातील बाजारपेठा उध्वस्त होणार आहेत त्या गावातील सरकारी जमिनीवर ठेकेदाराकडुन व्यापारी संकुल ऊभारण्यात यावे व त्या छोट्या व्यापार्‍यांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे.

हा रस्ता हायब्रीड अँन्युनीटी मॉडेल अंतर्गत होत असून यात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, बिओटी प्रोजेक्ट व इपीसी (इंजिनिअरींग प्रॉक्युरमेंट कंस्ट्रक्शन) या तीन सेक्टर अंतर्गत  हे सर्व काम होणार आहे. ठेकेदाराकडुन छोट्या गावातील उद्योग व्यवसायासाठी व्यापारी संकुल उभारणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे तेथील बाजारपेठ उध्वस्त होणार नाही. ज्या शेतकर्‍याची जमिन संपादित होणार आहे त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.