Thu, Jun 20, 2019 00:33



होमपेज › Ahamadnagar › वडिलांसमोरच मुलीचे अपहरण!

वडिलांसमोरच मुलीचे अपहरण!

Published On: Apr 14 2018 1:43AM | Last Updated: Apr 13 2018 11:17PM



राहुरी : प्रतिनिधी

राहुरीत पोलिस प्रशासनाचा कोणताही वचन न राहिल्याने गुन्हेगारी वाढते आहे. बारागाव नांदूर येथील अट्टल गुन्हेगार व वाळूतस्करांकडून 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला वडिलांदेखत चारचाकी वाहनात पळवून नेल्याची घटना घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरात एका घरासमोर 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी रात्री आईशेजारी झोपली असता, मध्यरात्री दोन वाजता येथीलच अट्टल गुन्हेगार व वाळूतस्कर किशोर साहेबराव माळी व  संजय भगवान बर्डे यासह अज्ञात तीनजणांनी त्या अल्पवयीन मुलीस चारचाकी काळ्या रंगाच्या गाडीतून पळवल्याचे पाहिले.  मुलीच्या वडिलांनी आरडाओरड केला मात्र तोपर्यंत ते पळून गेले होते. 

मुलीच्या वडिलांनी त्यांच्याशी संपर्क करत आमची मुलगी आम्हाला परत द्या, अशी विनवणी केली. पण त्याने मुलीच्या वडीलांना धमकी दिल्याची चर्चा आहे. या गुन्ह्याचा तपास स. पो. नि. दिलीप राठोड करत आहेत.दरम्यान, किशोर माळी या वाळू तस्कराने बारागाव नांदूर, राहुरी खुर्द, गोटुंबा आखाडा, जुने बसस्थानक परिसर, यासह राहुरी शहरातील  मुलींवरही याने अत्याचार केल्याची चर्चा आहे. 
जिल्हा पोलिस प्रमुख रंजनकुमार शर्मा यांनी याबाबत लक्ष घालावे व अशा विकृत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

Tags : Ahmadnagar, Daughter, kidnapped, front, father