होमपेज › Ahamadnagar › दरोडेखोरांच्या लवकरच मुसक्या आवळू : शर्मा

दरोडेखोरांच्या लवकरच मुसक्या आवळू : शर्मा

Published On: Aug 21 2018 1:30AM | Last Updated: Aug 20 2018 11:00PMकोळपेवाडी : वार्ताहर

येथील श्री लक्ष्मी ज्वेलर्स सराफ संगमनेरकर या दुकानावरील दरोड्याची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. काल पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दरोडेखोरांच्या लवकरच मुसक्या आवळणार असल्याचे सांगत दरोडेखोरांची माहिती देणार्‍यास बक्षीस देणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. कोळपेवाडी येथील दरोड्याच्या निषेधार्थ काल कोळपेवाडी, सुरेगाव व परिसरातील व्यावसायिकांनी व नागरिकांनी व्यवहार बंद ठेवली होती. पोलिस ठाण्यापासून हाकेवर अंतरावर घटना घडल्याने पोलिसांना दरोडेखोरांनी आव्हान दिले आहे. 

रविवारी रात्री उशिरा मिसा नावाच्या श्‍वानाने घटनास्थळापासून माहेगाव देशमुख परिसरापर्यंतचा माग काढला. यावेळी पोलिसांना े सोन्याचे दागिने ठेवण्याचे रिकामे बॉक्स आढळले. काही बॉक्समध्ये अंधारात दरोडेखोरांना सोने काढता आले नाही, असे दोन तोळे सोन्याचे दागिने मिळाले. रविवारी रात्रीच  पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी तपासाची चक्रे फिरविली. सोमवारी दुपारी 1 वाजता विशेष पोलिस महानिरीक्षक चेरिंग दोरजे यांनी घटनेची समक्ष पाहणी करून घाडगे कुटुंबाची विचारपूस केली व तपासी अधिकार्‍यांना सूचना केल्या. यावेळी सराफ असोसिएशनतर्फे त्यांना निवेदन देण्यात आले.  पोलिस अधीक्षक शर्मा यांनी घटना अतिशय दुर्देवी असून दरोडेखोरांच्या तपासासाठी 20 वेगवेगळी पथके तयार करण्यात आली असून राज्यात व राज्याबाहेर ही पथक रवाना करण्यात आली.

पथकात आजवर अशा घडलेल्या गुन्ह्यांमध्ये यशस्वी तपास करणार्‍या अधिकार्‍यांची मदत घेत ल्याचे त्यांनी सांगितले. घटनेची घाडगे बंधू यांचे नातेवाईक अक्षय संजय थोरात यांच्या नावे फिर्याद देण्यात आली. 

जखमी गणेश घाडगे यांच्यावर नाशिक येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या असल्या तरी त्यांच्या शरीरात बंदुकीच्या गोळ्या तशाच आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित शिवथरे हे करणार अलून, राज्य राखीव सुरक्षा दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.   नागरिकांना दरोड्यासंदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास 8888311000 या दूरध्वनीवर पोलिसांशी संपर्क करावा. महिती देणार्‍याचे नाव गुप्त ठेवले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

घाडगे कुटुंबियांची कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे यांनी भेट घेतली. आ. स्नेहलता कोल्हे यांनीही पोलिस अधीक्षक शर्मा यांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली.जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनीही घाडगे कुटुंबियांची भेट घेऊन सात्वन केले. दरम्यान, मयत शाम घाडगे यांचा मृतदेह काल साडेसात वाजता कोळपेवाडीत आणण्यात आला. अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.