Sun, May 26, 2019 01:27होमपेज › Ahamadnagar › सौभाग्य सदनचे ‘भाग्य’ उजळले!

सौभाग्य सदनचे ‘भाग्य’ उजळले!

Published On: Jan 15 2018 1:40AM | Last Updated: Jan 14 2018 10:57PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

माळीवाडा येथील महापालिकेच्या सौभाग्य सदन सांस्कृतिक सभागृहाची दयनीय अवस्था आणि तेथील गैरप्रकार काही महिन्यांपूर्वी चव्हाट्यावर आणण्यात आले होते. महापौर सुरेखा कदम यांनी याची गांभीर्याने दखल घेत सौभाग्य सदनाच्या नुतनीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. सभागृहाच्या नुतनीकरणाचे आदेश त्यांनी दिले आहेत. परिसरातील नागरिकांसाठी या ठिकाणी इनडोअर गेम्ससाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी येणार आहेत. त्यासाठी 92.42 लाखांची निविदाही प्रसिध्द करण्यात आली आहे.

सौभाग्य सदन सांस्कृतिक भवनाच्या झालेल्या दुरावस्थेमुळे कार्यक्रमांसाठी त्याचा वापर केला जात नाही. सभागृहाकडे जाणारा रस्ताही अरुंद असल्यामुळे या सभागृहाकडे, त्याच्या नुतनीकरणाकडे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष झाले. परिणामी, जनावरे बांधण्यासाठी या सभागृहाचा वापर स्थानिक नागरिकांनी केला. काही टवाळखोरांकडून भवनात गैरप्रकार सुरु झाल्याचेही काही दिवसांपूर्वी पुढे आले होते. महापौर कदम यांनी याची दखल घेत सभागृहाच्या नुतनीकरणाचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यासाठी 92.42 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. परिसरातील युवकांना, मुला-मुलींना इनडोअर गेम्ससाठी सुविधा, योगा केंद्र आदी सुविधा या ठिकाणी प्रस्तावित करण्यात येणार आहेत. त्यासाठी निविदाही प्रसिध्द झाली आहे.