Fri, Mar 22, 2019 05:35
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › नेवाशात तरुणीच्या अपहरणप्रकरणी गुन्हा 

नेवाशात तरुणीच्या अपहरणप्रकरणी गुन्हा 

Published On: Jan 19 2018 1:47AM | Last Updated: Jan 18 2018 10:48PMनेवासा : प्रतिनिधी       

घरात घुसून चाकूचा धाक दाखवून कपाटातील आठ हजार रुपये व पुतणीचे अपहरण केल्याची फिर्याद नेवासे पोलिस ठाण्यात महिलेने दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी अपहरण व दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवारी दुपारी एकच्या सुमारास मी, माझी जाऊ बसले असताना रुपेश तुकाराम शेंडे, गणेश मनोहर शेंडे, संतोष बाबुराव शेंडे व इतर तीन ते चार जण आले. त्यांच्याकडे विचारपूस करत असताना घरामागील उसातून रवींद्र विठ्ठल शेंडे आला. त्याने चाकू दाकवून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच माझ्या पुतणीला ओढून नेले. तसेच कपाटातून आठ हजार रुपये रोख रक्कमही नेली.

यापूर्वी दाखल एका गुन्ह्यात पोलिसांनी मुलीसह रवींद्र शेंडे याला गणपतीपुळे  (जि. रत्नागिरी) येथून ताब्यात घेऊन नेवासा येथे आणले होते. शेंडे हा कारागृहात होता. शेंडे यास जामीन मंजूर झाला आहे. त्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी बुधवारी शेंडे हा चार ते पाच जणांसह घरी आला. तसेच चाकूचा धाक दाखवून कपाटातील आठ हजार रुपये रोख व पुतणीचे अपहरण केले. पोलिसांनी शेंडेसह इतरांविरोधात अपहरण व दरोड्याचा  गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक माळी करित आहे.