Mon, Apr 22, 2019 23:45होमपेज › Ahamadnagar › शिवसेना उपनेते राठोड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा

शिवसेना उपनेते राठोड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा

Published On: Apr 09 2018 11:09PM | Last Updated: Apr 09 2018 11:09PMनगरः प्रतिनिधी

केडगाव येथील शिवसेना पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या खुनाच्या घटनेनंतर केडगाव परिसरात मोठे तणावाचे वातावरण पसरले होते. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी पोलिसांवर दगडफेक करत वाहतुकीस अडथळा निर्माण केला होता. याप्रकरणी शिवसेना पदाधिकाऱ्यांविरुद्ध आज(दि.09) कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

यात उपनेते माजी आमदार अनिल राठोड, शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक  सचिन जाधव, संभाजी कदम, हर्षवर्धन कोतकर, दत्ता जाधव योगीराज गाडे, विक्रम राठोड आदी शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश आहे.