अहमदनगर : शेवगावात कोरोनाचा शिरकाव, ढोरजळगाव सील 

Last Updated: May 29 2020 2:54PM
Responsive image
संग्रहीक छायाचित्र


शेवगाव : पुढारी वृत्तसेवा 

शेवगाव तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला असुन चाकण, पुणे येथुन आलेला ढोरजळगावच्या तरुणाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या अहवालानंतर लगेचच ढोरजळगाव गावठाण ७ जुनपर्यंत सील करण्यात आले. पॉझिटिव्ह तरुणाची पत्नी, आई, वडिल, आजी, भाऊ, एक खाजगी डॉक्टर यांना तपासणीसाठी कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले असून त्यांचे स्त्राव तपासणीस पाठविले आहेत.

अहमदनगर : काल जुळ्यांना जन्म दिलेल्या कोरोनाग्रस्त बाळंतिणीचा आज मृत्यू

हा तरुण चाकण येथील एका खासगी कंपनीत नोकरीला होता. तीन चार महिन्यापुर्वी तो ढोरजळगाव येथे गावी आला होता. एक महिन्यापुर्वीच त्याचा विवाह झाला होता. पाच सहा दिवसापूर्वी तो पुण्याला जाऊण आल्यानंतर त्रास होऊ लागला. त्यानंतर त्याने शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले तेथून तो ढोरजळगाव येथील आरोग्य उपकेंद्रात उपचारार्थ दाखल झाला. त्याच्यात कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्याला पुढील तपासणीसाठी नगर येथे दाखल करण्यात आले.

त्याचे स्त्राव तपासणीसाठी पाठविले असता शुक्रवारी तो कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. अहवालानंतर आरोग्य विभागाने बाधित रुग्णाच्या कुटूबांसह खाजगी डॉक्टरला कोविड सेंटर मधे दाखल केले आहे. या व्यतिरीक्त सदर बाधित तरुण कुणाच्या संपर्कात आला होता, याचाही शोध घेण्यात येत असुन ढोरजळगाव गावठाण ७ जुनपर्यंत सिल करण्यात आले आहे.

या बाधित तरुणाची वस्ती शेतात असल्याने घाबरुण जाण्याचे कारण नाही, सर्वांनी काळजी घ्यावी व घरातच थांबावे असे आवाहन तहसिलदार अर्चना भाकड यांनी केले आहे. तसेच जिल्ह्याबाहेरील जे एस.टी.चालक आले आहेत, त्यांना १० दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे. तर शहरातील पन्नास वयोवर्षापुढील वृध्द, गंभीर व दिर्ध आजारी असणारे नागरिक यांचा सर्व्हे करुण त्यांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहितीही तहसिलदार यांनी दिली आहे.