Fri, Nov 16, 2018 06:55होमपेज › Ahamadnagar › आ. कर्डिलेंचा कोठडीतील मुक्काम तिसर्‍यांदा वाढला

आ. कर्डिलेंचा कोठडीतील मुक्काम तिसर्‍यांदा वाढला

Published On: Apr 13 2018 1:12AM | Last Updated: Apr 13 2018 1:12AMनगर : प्रतिनिधी

पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला प्रकरणात भाजपाचे आ. शिवाजी कर्डिले यांचा पोलिस कोठडीतील मुक्काम तिसर्‍यांदा वाढला आहे. या गुन्ह्यात यापूर्वी अटक केलेल्या 11 जणांना एक दिवसांची कोठडी वाढून देण्यात आली, तर बुधवारी सायंकाळी अटक केलेल्या 7 जणांना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

दरम्यान, गुरुवारी उशिरा एसपी कार्यालयात तोडफोड प्रकरणात काशिनाथ बबन शिंदे, मयुर राजेंद्र कटारिया, सिद्धार्थ राजेंद्र शेलार, संजू हरिभाऊ दिवटे यांना अटक करण्यात आली आहे.गुरुवारी (दि. 12) दुपारी आरोपींना न्या. पाटील यांच्यासमोर हजर करण्यात आले होते. पोलिसांच्यावतीने युक्तिवाद करताना तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे व सरकारी वकील अ‍ॅड. ज्योती लक्का म्हणाले की, आरोपींना घटनेचे सीसीटीव्ही फूटेज दाखवून त्यांच्याकडून इतर फरार आरोपींची नावे निष्पन्न करायची आहेत. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांबाबत विचारपूस करून ती वाहने हस्तगत करायची आहेत. त्यामुळे आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी.

आरोपीच्या वकिलांनी बचावाचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आ. शिवाजी कर्डिले, अफजल शेख, सुरेश लक्ष्मण बनसोडे (रा. निखिल रो हौसिंग सोसायटी, बोल्हेगाव), सारंग ऊर्फ सागर अंबादास पंधाडे (रा. मोहनबाग, दिल्लीगेट), शुभम राजेंद्र राजवाळ (रा. कायनेटीक चौक), नगरसेवक फैय्याज शेख (रा. मुकुंदनगर), माजी नगरसेवक संजय गाडे (रा. फकीरवाडा), अवधूत जाधव (रा. सावेडी), धनंजय गाडे (रा. फकीरवाडा), अंकुश मोहिते (रा. सिद्धार्थनगर), एजाज ख्वाजा सय्यद ऊर्फ एजाज चिची (रा. झेंडीगेट) यांच्या कोठडीत एक दिवसांची वाढ करण्याचा व नव्याने अटक केलेल्या सागर सुभाष ठोंबरे, किशोर माणिक रोहकले, वैभव मच्छिंद्र म्हस्के, विकास पोपट झरेकर, गहिनीनाथ किसन दरेकर, सागर मुधकर डांगरे यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

आ. कर्डिलेंकडून वाहन हस्तगत

आ. संग्राम जगताप यांना पोलिस अधीक्षक कार्यालयातून पळविण्यासाठी वापरलेले काळ्या रंगाचे वाहन आ. कर्डिले यांच्याकडून हस्तगत करण्यात आले आहे. कँप पोलिसांनी ह्युंदाई कंपनीचे असेंन्ट मॉडेल पोलिसांनी जप्त केले आहे. 

Tags : Ahmadnagar,  Cordille, stay, cell, increased, third, time