Thu, Feb 21, 2019 09:30होमपेज › Ahamadnagar › सारसनगर परिसरात राडा, ५ जण पोलिसांच्या ताब्यात

सारसनगर परिसरात राडा, ५ जण पोलिसांच्या ताब्यात

Published On: May 28 2018 12:49AM | Last Updated: May 28 2018 12:49AMअहमदनगर : प्रतिनिधी 

 सारसनगर परिसरातील चिपाडे मळा येथे दोन गटात किरकोळ वादातून तुफान हाणामारी झाली. एकमेकांना लाकडी दांडके व दगडाने मारहाण करण्यात आली. रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही हाणामारी झाली. एकमेकांकडे खुन्नसने पाहण्यावरून हा वाद उफाळून आल्याचा  प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 रासकर व आंबेकर गटांत हे वाद झाले. घटनेची माहिती मिळताच भिंगार कँप पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे  परिस्थिती नियंत्रणात आली. पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांची धरपकड करून पाच जणांना ताब्यात घेतले आहे. या भांडणात तीन वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.