Sat, Jul 20, 2019 08:54होमपेज › Ahamadnagar › निळवंडेचे श्रेय घेण्यासाठी स्पर्धा : पिचड

निळवंडेचे श्रेय घेण्यासाठी स्पर्धा : पिचड

Published On: Jun 18 2018 1:08AM | Last Updated: Jun 17 2018 10:26PMअकोले : प्रतिनिधी

निळवंडे धरणाचे काम पूर्ण करताना आधी पुनर्वसन, मग धरण  हे धोरण राबविले. राज्यात हे धोरण आदर्शवत ठरले. अनेक अडथळे पार करीत मी हे धरण पूर्ण केले, या धरणाच्या कालव्यांच्या कामांना चालना दिली. मात्र, आता या कामांचे श्रेय घेण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे, अशी खोचक टीका माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी केली.पिंपळगाव खांड धरणस्थळी  स्व. जितेंद्र पिचड यांच्या स्मरणार्थ मुळामाता मंदिर उभारणी कामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी आ. वैभवराव पिचड,  हेमलताताई पिचड, प्रियंकाताई पिचड, राधिका पिचड, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील प्रदक्षिणे, संदीप देशमुख, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलासराव वाकचौरे, मधुकरराव नवले, मीनानाथ पांडे,  गिरजाजी जाधव, जे. डी. आबरे, यशवंत आभाळे, पर्बत नाईकवाडी, नगराध्यक्षा संगीता शेटे आदी उपस्थित होते. यावेळी पिचड म्हणाले की, मुळा बारमाही करता आली, याचे मोठे समाधान आहे. त्याच बरोबर दिवंगत पुत्र जितेंद्र याच्या स्मृती जागृत राहाव्यात, यासाठी सर्वांचे कल्याण करणार्‍या मुळा मातेचे मंदिर या ठिकाणी होत आहे. आ. वैभवराव पिचड म्हणाले की, पिंपळगाव खांड धरण करताना अनेक अडचणी आल्या. मात्र, त्यावर मात करीत हे धरण पूर्ण झाले असून परिसरातील शेतकर्‍यांच्या पाण्याचा प्रश्‍न कायम स्वरुपी मिटला आहे.यावेळी रो. मा. लांडगे, अजित देशमुख, विजय चौधरी, सीताराम गायकर, सीताराम देशमुख, भाऊसाहेब रकटे, मीनानाथ पांडे आदींचे भाषणे झाली.