Mon, Aug 19, 2019 09:05होमपेज › Ahamadnagar › बजेट रजिस्टर ‘खाली’ आणणार?

बजेट रजिस्टर ‘खाली’ आणणार?

Published On: Jan 11 2018 1:04AM | Last Updated: Jan 10 2018 10:45PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

बजेट रजिस्टर संदर्भात आ. संग्राम जगताप यांची तक्रार प्राप्त झाली आहे. याबाबत अधिकार्‍यांची बैठक  घेऊन चर्चा करण्यात येईल. बजेट रजिस्टर संबंधित विभागाच्या ताब्यात ठेवण्याबाबत व तरतुदी प्रस्तावित करण्याबाबत खातेप्रमुखांवर जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आयुक्‍त घनश्याम मंगळे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

पथदिवे घोटाळा प्रकरण चर्चेत आल्यानंतर आ. संग्राम जगताप यांनी महापौर कार्यालयाच्या ताब्यात असलेल्या ‘बजेट रजिस्टर’ची तपासणी व्हावी, अशी मागणी आयुक्‍तांसह राज्य शासनाकडेही केली आहे. या संदर्भात आयुक्‍त मंगळे यांना विचारले असता बजेट रजिस्टर संबंधित विभागात ठेऊन तरतुदी प्रस्तावित करण्याची जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी अधिकार्‍यांची बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल व त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.

दरम्यान, पथदिवे घोटाळाप्रकरणातील फायलींची चोरी व खोट्या स्वाक्षर्‍यांबाबत मनपाने तक्रार दिली आहे. काही कागदपत्रेही सादर केली आहे. पोलिसांकडून मंगळवारीच पुन्हा पत्र आले असून आणखी काही मुद्द्यांवर सविस्तर माहितीची मागणी केली आहे. ती सादर केली जात असून आमचा पाठपुरावा सुरु आहे. लवकरच गुन्हा दाखल केला जाईल. पर्यवेक्षक सावळे निलंबित असले तरी त्यांना फिर्याद दाखल करण्यास हकरत नाही. तसेच मुख्य लेखापरीक्षक चंद्रकांत खरात यांची सही खोटी असल्याने ते स्वतःही फिर्याद देवू शकतात, त्यासाठी त्यांना पत्र देण्याचीही गरज नाही. चौकशी समितीकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर अहवालानुसार योग्य ती कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.