होमपेज › Ahamadnagar › आषाढी दिंडीसमवेत आ. राजळेंची पाथर्डीत वृक्ष दिंडी

आषाढी दिंडीसमवेत आ. राजळेंची पाथर्डीत वृक्ष दिंडी

Published On: Jul 09 2018 1:01AM | Last Updated: Jul 08 2018 10:09PMपाथर्डी: राजेंद्र भंडारी

आषाढी वारीनिमित्त तालुक्यातून सुरू झालेल्या विविध दिंड्या समवेत आ. मोनिका राजळे यांनी पाथर्डीत वृक्ष दिंडी सुरू करून शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवडीअंतर्गत सुरू केलेल्या मोहिमेत सक्रीय झाल्या आहेत. पाणी फाऊंडेशन आयोजित वॉटर कप स्पर्धेत केलेल्या श्रमदानाला मोठा लोकसहभाग मिळाल्यानंतर आता गावोगांव जावून वृक्षदिंडी काढून वृक्षारोपनाचे कार्यक्रम घेतले जात आहेत.तालुक्याच्या सर्वांगीन विकासाच्या दृष्टीने आवश्यक बाबीकडे आ. मोनिका राजळे यांनी लक्ष केंद्रीत करुन जलयुक्त शिवार अभियान, सुक्ष्म सिंचन, श्रमदान, लोकसहभाग, वृक्षारोपन या चळवळी पुढे घेवून जाण्याचे काम सुरू केले आहे. माजी आ. राजीव राजळे यांच्या निधनांनतर तालुक्याचे विकासाभिमूख नेतृत्व अशी स्वत:ची ओळख निर्माण करण्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सुमारे चाळीस गावात स्वत: जावून श्रमदान चळवळीला प्रोत्साहन देवून ती यशस्वी ठरल्यानंतर आ. मोनिका राजळे यांनी तालुक्यात वृक्षारोपन व संवर्धन ही चळवळ हाती घेतली आहे. 

या चळवळीला शासन यंत्रणेसह स्वयंसेवी संस्था, तरुण मंडळे, गणेश मंडळे, शाळा, विद्यार्थी, बचत गट, ग्रामपंचायती यांचा मोठा सहभाग लाभत आहे. सुवर्णयुग मंडळाच्या वतीने पाथर्डी शहरातील वनदेव परिसरात आ. राजळे यांच्या हस्ते वृक्षारोपन केले. त्यांनतर धामनगांव, कासारपिंपळगांव, आगसखांड, माळीबाभूळगांव, कसबा पेठ, पाथर्डी शहर या ठिकाणी प्रातिनिधीत स्वरुपात वृक्षदिंडी काढून वृक्षारोपन केले. या सर्व मोहिमेत आ. राजळेंच्या समवेत पंचायत समिती, नगरपरिषद, वृध्देश्वर कारखाना, विविध ग्रामपंचायती व खरेदी विक्र्री संघाचे पदाधिकारी सहभागी होत आहेत. 

आ. मोनिका राजळेंनी श्रमदान, जलयुक्त शिवार, वृक्षारोपन व संवर्धन अशा चळवळी सुरू केल्याने तालुक्याच्या विकासाला एक नवी ओळख मिळत आहे. सार्वजनिक कामाबाबत नागरीकामध्ये जिव्हाळा व आपुलकी निर्माण होत आहे. वृक्ष संवर्धनासाठी शासन यंत्रणा अधिक सकारात्मक दृष्टया पुढे येवू लागली आहे. स्वयंसेवी संस्था, व्यापारी, विद्यार्थी व महिला वृक्षलागवड व संवर्धन करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. सत्कारातील फुले, हार, शाल, नारळ यांची जागा आता रोपटेने घेतली आहे. आंबा, चिंच, पेरु,अशी फळझाडे सत्कारासाठी वापरली जात असल्याने प्रमुख पाहुणे आवर्जून ही रोपे घेवून जात आहेत. शेतकर्‍यांंनी आपल्या आवडीची शंभर रोपे आपल्या बांधावर लावून जोपासली तर संबधीत शेतकर्‍याला तीन वर्षात सुमारे पन्नास हजारांहून अधिक अनुदान देण्याच्या शासन निर्णयाची माहिती आ. राजळे नागरीकांना देवून वृक्ष, हवा, पर्यावरण, पाऊस, पाणीपातळी यांची माहीती देत असल्याने आ. राजळेेंचे भाषण लोकांसाठी प्रबोधन ठरत आहे. तालुक्याच्या राजकारणाला विकासाची दिशा देण्याचे काम राजळेंच्या माध्यमातून सुरू झाल्याची भावना लोकमानसात निर्माण झाल्याने राजळेंची वृक्षदिंडी आता आषाढीच्या पंढरपूर वारीत कशी सामील होते याकडे लक्ष लागले आहे.